उर्दू ,गझल आणि हळूहळू लुप्त होत चाललेलं अभिजात संगीत!.....
"हम लबों से कह ना पाए उनसे हाल-ए-दिल कभी
और वो समझे नहीं ये खामोशी क्या चीज है!"
आजही या दोन ओळी ऐकल्या की अंगावर सरसरुन काटा येतो,जो तीन वर्षांआधी सर्वप्रथम आला होता.काय ते शब्द,श्रवणीय चाल आणि जगजीत सिंग साहेबांचा जीव ओवाळून टाकावा असा विलोभनीय आवाज!
खरं तर संगीताचा आणि माझा संबंध तसा लहानपणापासूनच होता,आणि सुदैवाने तो माझ्या कानांपुरताच मर्यादित राहिला.घरात वडील,आजोबा दोघेही गायचे.काका स्वर्गीय पं.कैलास देशपांडे यांनी त्या काळात पं.भीमसेन जोशींसोबत मैफिलींमधे साथसंगत केलेली.त्यामुळे अर्थातच घरात सांगितिक वातावरण होतं.'हे सुरांनो चंद्र व्हा' पासून अगदी'बाबुल की दुआएँ लेती जा' पर्यंत त्या काळातली सगळी एव्हरग्रीन म्हणता येतील अशी गाणी ऐकत मी लहानाचा मोठा झालो.परंतु घराण्याचा हा गुण माझ्यामधे पुस्तकातल्या कवितांना गाण्यांच्या चाली लावण्याइतपतंच उतरु शकला.गाणी भरपूर ऐकली जायची,पण त्यातले शब्द,चाल याकडे माझ्या बालसुलभ बुध्दीला कधी लक्ष द्यावंसं वाटलं नाही.आणि हे सगळं मी इंजिनीअरींगला अॅडमिशन घेईपर्यंत असंच सुरु होतं.
इंजिनीअरींगला अॅडमिशन घेऊन पुण्यात(तळेगावात)राहायला आलो आणि रिकामपणाने मला ग्रासायला सुरुवात केली.दुपारपर्यंत काॅलेज केल्यावर राहिलेला वेळ काहीच काम नसायचं.असंच एकेदिवशी युट्यूब चाळताना एक व्हिडीओ दिसला.'जश्न-ए-रेखता 'मधील 'टीम सुखन'नी सादर केलेली कव्वाली," सादगी तो हमारी जरा देखिये,ऐतबार आपके वादे पर कर लिया...बात तो सिर्फ इक रात की थी मगर,इंतजार आपका उम्रभर कर लिया!" याआधीही मी खूप कव्वाली ऐकल्या होत्या,पण ह्या कव्वालीतल्या पहिल्याच ओळीने मला अक्षरशः जिंकून घेतलं.मी पूर्ण कव्वाली ऐकली,त्यासोबतच त्यांचं शेरोशायरीचं सादरीकरण पाहिलं आणि मी थक्क झालो.हळूहळू "सुखन"चे सगळे व्हिडीओ मी पाहिले."सादगी तो हमारी"ची तर अक्षरशः पारायणं केली.मराठी,इंग्रजी आणि 8 वीपर्यंत असलेली तोडकीमोडकी हिंदी व त्यानंतर स्कोअरिंग साठी 10वीपर्यंत शिकलेलं संस्कृत हीच काय ती माझी भाषासंपत्ती.पण याहीपलीकडे ऊर्दू नावाचं ,कधीच नं उतरणारी नशा चढवणारं रसायन होतं आणि हळूहळू मी त्याच्याशी 'रुबरु' होत होतो.
हळूहळू आतिफ अस्लम ते नुसरत फतेह अली खाँसाहेब आणि अरिजीत सिंग ते जगजीत सिंग साहेब अशा माझ्या आवडी कधी बदलल्या मला कळालंच नाही.दररोज ऐकलं जाणारं प्रत्येक गाणं,त्याचे शब्द मला वेड लावत होते.या जादुई,रोमहर्षक व खिळवून ठेवणार्या जगाशी मी आजपर्यंत अनभिज्ञ होतो,प्रत्येक गाणं व त्यातील शब्द जणू मला त्या जगाची सफरच घडवत होते.'चुपके चुपके रात दिन'ऐकून मी जितका धाय मोकलून रडायचो तितकंच 'सफर में धूप तो होगी'ऐकून मला प्रेरणादायी वाटायचं.जगजीत सिंग व नुसरत साहेबांसोबतच उस्ताद गुलाम अली खाँसाहेब,मेहदी हसन साहेब यांची गाणी आता माझ्या "मोस्ट प्लेड"मधे दिसू लागली.राहत इंदोरी,निदा फाजली,अहमद फराज,साहिर लुधियानवी या अवलियांचे शेर माझ्या "स्क्रीनशाॅट फोल्डर"मधे जमा होऊन त्यांची पारायणं होऊ लागली.मराठी तुम्हाला संभाषण शिकवते,इंग्रजी तुम्हाला जगाशी जोडून राहायला शिकवते...आणि उर्दू...?उर्दू तुम्हाला जगायला शिकवते!उर्दू तुमची वाचा समृध्द करते,उर्दू शिकताना तुम्ही प्रत्येक भाषेमधे,तिच्या उच्चारामधे सौंदर्य शोधायला लागता,जगात उर्दू सोडून अशी कोणतीच भाषा नाहीये जिच्या उच्चारांवर,सादरीकरणावर,लहेजावर एवढं लक्ष दिलं गेलंय.आपलं दुर्भाग्य हेच की एका विशिष्ट समाजाची भाषा असा शिक्का मारुन आपल्या देशात उर्दूला नेहमीच दुय्यम स्थान दिलं गेलंय.
आजकाल दर आठवड्याला पोत्याने चित्रपट प्रदर्शित होतायत,त्यात प्रत्येक चित्रपटात कमीत कमी 5-6 गाणी असतात.त्यापैकी एक आयटम साँग हा तर जणू नियमच आहे,तसेच बाकी हलकी फुलकी गाणी व एखादं गंभीर गाणं!झालं संपला चित्रपट...किती चित्रपटांमधे गझल,कव्वाली किंवा शास्त्रीय गाणी असतात? चित्रपटांमधील संगीताचा दर्जा झपाट्याने खालावत चाललाय.रॅपच्या व रिक्रीएशन च्या युगात आपल्या इथे गल्लीबोळामधे असलेले लेखक,भावी संगीतकार होऊ पाहणारे युवक कामाच्या शोधात दारोदार भटकत आहेत.जुनं गाणं उचलायचं,त्यात थोडे बीट्स टाकायचे,नवीन एखाद्या आॅटोट्यूनबहाद्दर गायकाकडून ते गाऊन घ्यायचं,जमल्यास एखादा तुटका फुटका रॅप त्यात टाकायचा हे प्रकार आजकाल प्रत्येक चित्रपटात सर्रास होत आहेत.तसेच गाण्यांमधे अर्थहीन शब्दांचा वापरही खूपच वाढलाय.आजच्या काळातलं एखादं गाणं लावलं तर आपले आई वडील किंवा आजी आजोबा नाक मुरडतात.याचं प्रमुख कारण मला गीतांचे निरर्थक शब्द वाटतात. यमक,उपमा हे अलंकार नामशेष होताना दिसतायत. अर्थात शंकर महादेवन,राहत फतेह अली खान यांसारखे संगीतकार,गायक व मनोज मुंतशिर,अमिताभ भट्टाचार्य सारखे गीतकार हिंदी व ऊर्दूमधे,तसेच महेश काळे,राहुल देशपांडे,जसराज जोशी सारखे गायक, संगीतकार व गुरु ठाकूर,वैभव जोशी,संदीप खरे सारखे गीतकार मराठीमधे अभिजात संगीत ,शब्द टिकवून ठेवण्याचा प्रयत्न अजूनही करत आहेत.
ही आपल्या पूर्वजांनी दिलेली अभिजात देण आपल्या येणार्या पिढीपर्यंत पोचवणं आपलं काम आहे.रेव्ह पार्ट्या,डीजे नाईट्स,पब मधे दिसणारी गर्दी एखाद्या मुशायर्याच्या कार्यक्रमाला,गझल संध्येच्या कार्यक्रमाला,कविसंमेलनाला का दिसत नाही,सनम पुरी ची रिप्राईज गाणी ऐकणारी तरुणाई गुलाम अली खाँसाहेबांना कधी ऐकणार?याचा विचार व्हायला हवा.अर्थात या सर्व गोष्टींना विरोध नाहीच,परंतु हे असंच सुरु राहिलं तर आपण व आपली येणारी पिढी एका अमूल्य ठेव्याला मुकेल एवढं नक्की!ते म्हणतात ना,माणसाला आधी शेपटी होती,कालांतराने ती कमी कमी होऊन नाहीशी झाली आणि त्या जागेला आपण आता माकडहाड म्हणतो.उर्दू,गझल,शायरीच्या बाबतीतदेखील हेच होईल की काय अशी खूप वेळेस भिती वाटते. त्यामुळे होणार्या बदलांचा स्वीकार नक्कीच करावा,परंतु त्यासोबत आपल्या संस्कृतीचा,वैभवशाली वारश्याचा विसर पडता कामा नये!
शब्दांकन- उत्कर्ष देशपांडे

Mast re 👌👌👌
ReplyDeleteधन्यवाद
Deleteमस्त भावा
ReplyDeleteधन्यवाद भाऊ
DeleteKadak bhai
ReplyDeleteThank you
Delete